आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:शेतकऱ्यांचा नेता आमदारकी मिळणार कळाल्यावर शांत, चंद्रकांत पाटलांची राजू शेट्टींवर टीका

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

राज्यात दुधाचे दर घसल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या टीकास्त्र सोडलं आहे. “दुध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याची तयार दर्शवणारे राजू शेट्टी कधी आंदोलन करणार आहेत, हे आम्हाला पाहायचं आहे. शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेणार आज आमदारकी मिळणार असल्याचं समजताच शांत बसले आहेत” असा टोला पाटील यांनी शेट्टी यांना लगावला आहे.

याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की ,“सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या दुधाच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आली नाही, मग शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे दूध काय वेगळ्या पद्धतीचं आहे का? त्यात एवढी फारकत का? राजू शेट्टी यांना आणखी एक गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे युरिया देखील कुठेच मिळत नाहीये. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्त असून, संकटात सापडले आहेत,” असं पाटील म्हणाले.