आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात काँग्रेसमुक्तीचे धोरण:पंतप्रधान मोदींना अभिप्रेत काँग्रेसमुक्त देश घडवणार, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे सांगलीत वक्तव्य

सांगलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील राजकारणातही काँग्रेसमुक्तीचे धोरण यशस्वीपणे राबवले जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेला काँग्रेसमुक्त देश घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपच्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिली.

शरद पवार यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी भेट घेतली त्याला अनेक कंगोरे आहेत, असे म्हणत मुंडे यांनी मोदी आणि पवार यांचे संबंध राजकारणातील प्रत्येकालाच माहिती आहेत. त्यामुळेच राज्यातील त्यांच्या समर्थकांना वाचवण्यासाठीच पवार हे पंतप्रधानांकडे राज्याचे विषय घेऊन गेले असतील, असेही त्या म्हणाल्या.

जानकर यांनी धीर धरावा
महादेव जानकर यांनी धीर धरावा. त्यांनी भाजपपासून दूर जाऊ नये, अशी पक्षातील नव्हे तर समस्त ओबीसी समाजाची इच्छा आहे. ते आपल्यावर नाराज नाहीत. मात्र, पक्षातील एखाद्या वरिष्ठ नेत्यावर नाराज असतील, असेही त्या म्हणाल्या