आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली:सरकार आणि कर्मचारी यांच्यात कोणताच ताळमेळ झाला नाही; सरतेशेवटी हे आंदोलन भरकटले, गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया

एसटी कर्मचारीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार आणि सएसटी कर्मचारी आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे गोपीचंद पडळकर यांनी सिल्व्हर ओकवरील हल्ला आणि एसटीसंपावर आपले मत व्यक्त केले. सिल्व्हर ओकवर जे घडले, त्याबाबतीत पोलीस यंत्रणा तपास करेल. त्यांचा तपास होईपर्यंत यावर काही बोलणं योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. तसेच सरकार आणि एसटी कर्मचारी यांच्यामध्ये कोणतीही सहमती झाली नाही. मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खदखद होती आणि त्यामुळे एका काळानंतर आंदोलन भरकटले, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. सांगलीच्या आरेवाडीमध्ये माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

एसटी संपातून 26 नोव्हेंबर 2021 ला आम्ही बाहेर पडलो होते. तेव्हापासून न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वेगळे असे काहीच घडले नाही. सरकारच्या पगारवाढीच्या घोषणेनंतर यापेक्षा वेगळ काही मिळणार नाही, असे आम्ही कर्मचाऱ्यांना सांगितले होते. पण, कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम होते, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच आम्ही आंदोलनातून बाहेर पडल्यानंतर सरकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये कोणतीही सहमती झाली नाही. अखेर हे आंदोलन भरकटले आहे, असे पडळकर म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, तेव्हा सुरवातीला आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आंदोलनाचे नेतृत्व करत होते. राज्य सरकारकडून वेतननिश्चिती आणि पगाराबाबत निर्णय दिल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आंदोलनातून माघार घेतली होती. मात्र, आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांनी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला होता.

काय प्रकरण?
एसटीतील 23 कामगार संघटनांची कृती समिती स्थापन करत 27 ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत संप पुकारला होता. यानंतर सरकारने महागाई भत्ता 28 टक्के, 41 टक्के पगारवाढसह इतर काही मागण्या पूर्ण केल्या. 20 डिसेंबर रोजी 54 दिवसांच्या आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मिटल्याचं म्हटलं होतं. पण, एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ही मागणी आझाद मैदानात कर्मचाऱ्यांनी कायम धरली होती.

यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारने विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला. यानंतर मुंबई उच्च न्यायायाचे एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष केला. पण, त्यानंतर अचानक आंदोलनकर्त्यांची 8 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी धडक देत चप्पल आमि दगडफेक केली. यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.