आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारीने मुंडकी छाटून टाकावीत असे वाटते:उदयनराजेंचा संताप; म्हणाले- मला खूप राग आला, रायगडावर वेदना मांडणार

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना आता यापुढे सहन करणार नाही. त्यांची इतरांशी तुलना करणे हा बदमाशपणा आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या यासंदर्भातील वेदना किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी मांडू. एवढा संताप आला आहे, राग आलाय की असं वाटतं की तलवारीने मुंडकी छाटून टाकावीत असे संतप्त वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केले.

उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे जलमंदिर पॅलेस मध्ये पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, वेदना मांडण्यासारखे त्या इतके चांगले ठिकाण दुसरे नाही. आम्ही पुढचा निर्णय तेथेच जाहीर करणार आहोत.

भाजपच्या नेत्यांकडून संपर्क नाही

उदयनराजे म्हणाले, छत्रपतींचा सन्मान म्हणजे समस्त महापुरुषांचा सन्मान आहे असे सांगून खा. उदयनराजे भोसले म्हणाले की आत्तापर्यंत मला भाजप अथवा अन्य कोणत्याही पक्षाकडून भाजपच्या नेत्यांकडून संपर्क झालेला नाही.

त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली

उदयनराजे म्हणाले, मला जे योग्य वाटते ते मी करतो. त्यांना जे योग्य वाटेल ते ते करतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या नरेंद्र पाटलांनी शिवाजी महाराजांशी तुलना करणे गैर नाही असे विधान केले होते. त्यावर उदयनराजेंना विचारता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल असे सांगून त्यांनी नरेंद्र पाटलांवर टीका केली.

शिवसन्मान निर्धार कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यापासून ते अगदी खालच्या थरावरचा कार्यकर्ता असलेल्या प्रवृत्ती अवहेलना करीत आहेत आणि कोणत्याही पक्षाचा वरिष्ठ नेता त्यांना यासंदर्भात सुनावत नाही आणि सरकारही त्यावर कारवाई करत नाही. याचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील खा. उदयनराजे भोसले हे सातारा येथून किल्ले रायगडावर शिवसन्मान निर्धार कार्यक्रमाच्या माध्यमातून निघाले आहेत. आज दुपारी सातारा येथील जलमंदिर पॅलेस मध्ये छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

रायगडावर रवाना होणार

साताऱ्याच्या पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला समर्थक कार्यकर्त्यांसमवेत पुष्पहार अर्पण करून हजारो कार्यकर्ते वाई मार्गे पांचगणी , महाबळेश्वर करून महाडकडे रवाना झालेले आहेत. आज महाड येथे कार्यकर्त्यांचा मुक्काम आहे आणि उद्या सकाळी ते रायगडावर जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...