आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापुरात राजकीय वातावरण तापलेल पाहायला मिळते आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. यातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे कुडबुडे ज्योतिषी आहेत, अशी टीका सावंतांनी केली आहे.
नेमके काय म्हणाले सचिन सावंत?
कुडबुड्या ज्योतिषाला कोल्हापूरच्या सीमेबाहेर घालवले, त्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे अभिनंदन करतो, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सरकार पडणार असे ते दरवेळी सांगतात, सरकार पडण्याच्या तारखा देतात, 72 तासांत मंत्री होणार असे सांगतात, मात्र अजूनही एक तारीख सत्यात उतरली नाही. अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर केली तर ते धमकी देतात. असे सावंतांनी म्हटले. शिवसेनेच्या संजय राऊत यांना धमकी देतात. आता तर ते ईडी पाठवतो अशा धमक्या कोल्हापूरच्या जनतेलाही देत आहेत. भाजपच्या धमक्यांमुळे ईडी हा जोक झाला आहे, अशी जोरदार टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मतदारांना पेटीएमद्वारे पैस दिले जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्या आरोपाला सचिन सावंत यांनी उत्तर दिले आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील बघतील म्हणून कोल्हापूरातील जनतेला पासबुक लपवावे लागेल, अशा शब्दात सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाची खिल्ली उडवली आहे.देवेंद्र फडवणीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आजूबाजूला पहावे आणि मग सांगावे. सगळे भ्रष्टाचारी त्यांच्याकडे आहेत, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करून त्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्याच्या प्रकाराची ईडीकडून चौकशी होऊ शकते, असा इशारा त्यांनी कोल्हापुरच्या मतदारांना दिला होता. आपण नागरिकांना घाबरवण्याऐवजी त्यांना सावध केले असे पाटील यांनी सांगितले. यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी आपल्याला दुवा दिला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. कोल्हापुरात मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.