आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार जयंत पाटील यांनी लगावला टोला:‘बारामतीत भाजपच शरणागती पत्करेल’

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाच्या जातीयवादी शक्तीचा अश्वमेध राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी रोखला आहे. त्यामुळे भाजपचा अहंकार दुखावला गेला आहे. या राजकीय घडामोडींमुळेच सध्या बारामती मतदारसंघाला ‘लक्ष्य’ केले जात आहे.

बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असून त्यावर हल्ला करताना भाजपलाच शरणार्थ पत्करावे लागणार आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला.पाटील म्हणाले की, बारामतीत लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील.

बातम्या आणखी आहेत...