आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपवर निशाणा:अधिकाऱ्यांचे बोट धरुन सत्तेवर येण्याचा भाजपचा प्रयत्न- गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपचे धोरण राज्याच्या प्रतिमेला घातक

आम्ही सत्तेवर येणारच आहोत, बहुमत आम्ही सिद्ध करणारच आहोत, हा भारतीय जनता पक्षाचा दावा अधिकाऱ्यांच्या जीवावर केला जात होता, हे आता सिद्ध झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांचे बोट धरुन भाजप सत्तेत येण्याचा प्रयत्न करत होते. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही सत्तेच्या माध्यमातून अधिकारी बळी पडत आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्षाने बहुमताने जे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे, त्यामध्ये भाजपने बिघाडी आणण्यापेक्षा विरोधी पक्षाची भूमिका योग्य निभवावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले, गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल बाहेर आला. हा अहवाल विरोधी पक्षनेते पत्रकार परिषदेमध्ये दाखवतात, हे खूपच वाईट आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने असा प्रकार घातक आहे. विरोध पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांनी ही गोपनीयता पाळायला हवी होती.

भाजपचे धोरण राज्याच्या प्रतिमेला घातक....

भाजपला सत्ता हवी आहे. ती कशीही हवी आहे, मग त्यासाठी आम्ही काहीही करणार. अगदी कायदा मोडणार. सिक्रेट ऍक्टचा विचार करणार नाही. कागदपत्रे कशाही पद्धतीने मिळवू आणि तो लोकांपर्यंत पोच करणार, हे राज्याच्या हिताच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला घातक ठरणारे धोरण भाजपने स्वीकारले आहे.

गोपनीय रिपोर्ट बाहेर येण्याचा घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येते की रश्मी शुक्लांच्या यांच्याबाबतची वक्तव्ये समोर आली आहेत. यामध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही धाडसाने शुक्लांबाबत स्पष्टता दिली आहे. अजून असे किती आमदार आहेत, ज्यांना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्यात आला आहे. हे तपासून पहावे लागले. शुक्लांच्या माध्यमातून अनेक आमदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असणार आहे. याची माहिती घ्यावी लागले. ज्यांच्यावर दबाव टाकण्यात आला तेही लोक लवकरच समोर येतील, असेही पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...