आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे चुकीचे विधान केले. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर पुन्हा भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला. लाड यांना पक्षप्रमुखांनी प्रशिक्षण द्यावे. जमत नसेल तर महाराष्ट्र सोडावा असे स्पष्ट शब्दात आज सुनावले.
बेजबाबदार वक्तव्य
संभाजीराजे म्हणाले, लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे.
ही शरमेची बाब
संभाजीराजे म्हणाले, प्रसाद लाड हे जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. ते आमदार आहेत. मात्र शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे ते म्हणत आहेत. ही शरमेची बाब आहे. मी त्यावर काय बोलणार. त्यांनीच याबाबत उत्तर द्यावे.
विधान केलेच कसे?
प्रसाद लाड यांनी बेजबाबदार विधान केलेच कसे. लहान मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेतच शिकवणे गरजेचे आहे. प्रसाद लाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. इकडे शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. ते आमची अस्मिता आहेत, असे लाड म्हणतात. तर दुसरीकडे शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असा दावा करतात. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. नुसती माफी मागी मागून चालणार नाही.
प्रसाद लाड यांचे 'ते' विधान
प्रसाद लाड यांनी कोकणातील एका कार्यक्रमात बोलताना वक्तव्य केले की, 'संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली.'
लाड यांची दिलगीरी
लाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगीरी व्यक्त केली. ते म्हणाले, मी अनावधानाने शिवरायांचा जन्म कोकणात झाला असे म्हणालो. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला. शिवरायांचे बालपण रायगडावर गेले. तो गड कोकणात आहे. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.