आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:कर्नाटक सरकारकडून कोरोना धास्तीने नाकाबंदी, सीमेवर पुन्हा कोरोना चेक पोस्टद्वारे वाहनधारकांचे थर्मल टेस्टींग सुरू

कोल्हापूर4 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा कोरोना चेक पोस्ट कर्नाटक राज्य सरकारने उभा केला असून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनधारकांना तपासणी करून पुढे सोडले जात आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर आजपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनधारक आणि नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग सुरू झाले. देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. देशभरातील कोरोना रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्ण अधिक आढळून आले आहेत. याच धास्तीमुळे कर्नाटक सरकारने आजपासून सीमेवर पुन्हा कोरोना चेक पोस्ट सुरू केले आहेत.

तपासणीशिवाय राज्यात प्रवेश देऊ नका तहसीलदारांच्या यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. आज दुपारपासून सुरू झाली आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्या सह पोलिसांकडून राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवली जात आहे.