आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोल्हापूर शहरातील सरनोबतवाडी येथील राजाराम तलावात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह एका प्लास्टिक पिशवीत निदर्शनास आला. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी तातडीने सुरू केले.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना आज सकाळी राजाराम तलाव येथे एका पिशवीत मृतदेहाचे अवशेष असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली. पिशवीतून अवशेष बाहेर काढल्या नंतर हे एका महिलेच्या अर्धवट मृतदेहाचे अवशेष असल्याचे स्पस्ट झाले. या महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले आहे. ही महिला अंदाजे 60 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.
दरम्यान शांताबाई शामराव आगळे (वय 75) असे त्यांचे नाव आहे. राजाराम तलावाच्या उत्तरेच्या रिकाम्या बाजूत गोणपाटात त्यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळले. अवघ्या तासाभरात पोलिसांनी या खूनाचा छडा लावला. सोन्याच्या दागिन्यांसाठी ओळखीच्याच तरूणाने हा खून केल्याचे तपासात पुढे आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. संतोष परीट (वय - 35 रा.राजलक्ष्मी अपार्टमेंट माळी कॉलनी, टाकाळा कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे.
मृत महिला शुक्रवारी अचानक बेपत्ता झाल्या. त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला. पण त्या सापडल्या नाहीत. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान आज सापडलेल्या मृतदेहाच्या अवशेषाची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना बोलवून घेतले. त्यांनी सापडलेली साडी व पर्सवरून मृतदेह ओळखला. तसा पोलिसांनी गतीने तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच खूनाचा छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.