आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खद:कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यात मुलगा बुडाला; एकाला वाचवण्यात आले यश

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापुरात कसबा बावडा येथे राजाराम बंधाऱ्यात पोहोण्यासाठी उडी मारलेल्या दोन शाळकरी मुलांपैकी एक जण बुडाला, तर एकाला वाचवण्यात यश आले. मिहिर इम्रान पठाण (१०, रा. लाइन बझार, कोल्हापूर) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. तर नाव मानव गणेश कांबळे (१२, रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा) याल वाचवण्यात यश आले. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माहीर व मानव यांच्यासह काही शाळकरी मुले दुपारी एकच्या सुमारास पंचगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी आली. माहीर व मानव या दोन मित्रांनी राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात उडी घेतली. त्यानंतर दोघेही बुडू लागले. यात एकाला वाचवले.