आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात 5 कैद्यांचे फिल्मी स्टाइल पलायन:औंध पोलिस ठाण्याचे तोडले लॉकअप, गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची ड्यूटीवरील पोलिसांना मारहाण

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्याचे लॉकअपचे दार तोडून दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील 5 आरोपी आज पहाटे पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पळून जाण्यासाठी दरोडेखोर आरोपींनी लॉकअपचे दार तोडलेच शिवाय ड्युटीवरील पोलिसांना मारहाण केल्याचीही माहिती आहे.

विशेष म्हणजे कालपासून महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सातारा येथेच आहेत. त्यात ही घटना घडल्याने सातारा पोलीस अक्षरशः सैरभैर झाल्याचे चित्र आहे. औंध पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी या संशयित दरोडेखोरांना एका गुन्ह्यात अटक केलेली होती. हे सर्व संशयित पाच जण पोलीस कोठडीत होते. बीड व अहमदनगर जिल्ह्यातील हे संशयित आरोपी असून त्यांची नावे सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले अशी आहेत. ही घटना आज पहाटे घडली त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस आता पळून गेलेल्या पाच संशयित आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...