आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरी मुलगीच कोरोना पॉझिटिव्ह:सासरच्या मंडळींत गदारोळ, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील प्रकार

कोल्हापूर3 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • लग्न समारंभात जवळपास दिड दोनशे लोक उपस्थित होते

इचलकरंजी शहरात नवरी मुलगीच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कार्यालयात उपस्थित असणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले. ही घटना रविवारी इचलकरंजीत घडली. या विवाह सोहळ्याला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एवढेच नव्हे तर सासरच्या मंडळींत चांगलाच गदारोळ माजला.

शनिवारी शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यातील एका बाधिताच्या मुलीचे रविवारी लग्न निश्चित झाले होते. वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून लग्न सोहळा पार पडला. मात्र कुटुंब बाधिताच्या संपर्कात असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. याचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यामध्ये खुद्द नववधूलाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे लग्न मंडपात खळबळ उडाली.

लग्न समारंभात जवळपास दिड दोनशे लोक उपस्थित होते. नवरी पाॅझिटीव्ह आल्याचे कळताच पै पाहुणे वर्हाडी सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. इकडे प्रशासनही सतर्क झाले आहे. लग्न समारंभात प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून 100 ते 150 जण उपस्थित होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.