आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीचा वाद:जमिनीच्या वादातून कोल्हापुरात भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इचलकरंजी येथील सख्या भावांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

इचलकरंजी येथे राहणारे तेजपाल महावीर चौगुले आणि अंकुश महावीर चौगुले यांची इचलकरंजी या ठिकाणी जमीन आहे. भाऊबंदकीमध्ये या जमिनीचा वाद सुरू असून इचलकरंजीच्या तहसीलदारांनी या जमिनीची समान वाटणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात तेजपाल चौगुले यांच्या चुलत्यांनी इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले आहे.. या ठिकाणी वादग्रस्त जमिनीची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत. या निर्णयाविरोधात उद्विग्न झालेल्या तेजपाल आणि अंकुश चौगुले या सख्या भावानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.. मात्र या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी खुदबुद्दीन मुजावर यांनी चौगुले यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...