आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय रद्द करावा, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एस.आर. बोम्मई यांच्याकडे केली. या वेळी बोम्मई यांनी जलतज्ज्ञांशी विचारमिमांसा करूनच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राजूू शेट्टी यांना रविवारी दिले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एस.आर. बोम्मई दोन दिवसांच्या बेळगाव भेटीसाठी आले होते. रविवारी सकाळी राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी धरणाची उंची वाढवण्याबरोबरच कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा हिरण्यकशी नद्यांवरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणीही केली. तसेच सातत्याने येणाऱ्या महापुरामुळे हजारो हेक्टरमधील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तसेच सुमारे १५ लाख लोकांना दरवर्षी विस्थापित व्हावे लागते. त्यामुळे अब्जावधी रुपयांचा फटका हा शासनाला बसतो. याची सविस्तर माहीतीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिली.
दै. ‘दिव्य मराठी’ ने अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णया संदर्भात बातमी प्रकाशित केली होती. कृष्णा नदीच्या पात्रातून पाण्याचा विसर्गही मंदावत चालला आहे. विविध नद्यांच्या वर बांधलेल्या पुलामुळे दोन्ही बाजूस दोन-दोन किलोमीटर भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे महापुराच्या काळामध्ये नदीच्या पात्रपासून दोन किलोमीटर पाणी पसरते, असे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीशी समन्वय ठेवूनच याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.