आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे अढळला पाऊण किलो गांजाचा साठा अणि दहा मोबाईल

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

कोल्हापूरात असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्याकडे तब्बल पाऊण किलो गांजाचा साठा आणि दहा मोबाईल फोन, पाच चार्जर काॅड, दोन पेन ड्राईव्ह सापडल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. अत्यंत कडेकोट सुरक्षा भेदून गांजासारखा आमली पदार्थ, मोबाईल कारागृहात पोहोच झाल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध राजवाडा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज बुधवारी दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापडाच्या पुडक्यात सापडलेले १० मोबाईल्स, दोन पेन ड्राईव्ह ५ चार्जर कॉर्ड, ७७५ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. कारागीर रक्षकांनी सकाळी कळंबा कारागृहातील सर्व सेलची कसून तपासणी केली.

मंगळवार दिनांक 22 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओमधून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी कापडाचे तीन पुडके संरक्षक भिंतीच्या कठड्यावरून कारागृहात दिले. हा प्रकार कारागृह रक्षक रवींद्र भाट (रा. चांदेकर वाडी, ता. राधानगरी) यांच्या निदर्शनास आला. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयित आणि वाहनांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप तपास यंत्रणेला यश आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...