आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:साताऱ्यात भंगार दुकान परिसरातून 5.22 लाखांची गांजाची झाडे जप्त

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साताऱ्यातील वाढे फाटा हद्दीतील एका भंगार दुकानाच्या परिसरातून ५ लाख २२ हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी परशुराम ठाकूर (रा. करंजे, सातारा) या संशयितावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढे फाटा येथील जयदुर्गा स्क्रॅप मर्चंट या भंगार दुकानाच्या परिसरात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने भंगार दुकानावर छापा मारून गांजाची झाडे जप्त केली आहेत. बाजारात या गांजाची किंमत ५,२२,००० रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...