आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Center's Interference In Election Commission, A Man Without A Backbone In A Constitutional Position, They Have No Fear Prakash Ambedkar Criticizes

निवडणूक आयोगात बजबजपुरी:कणा नसलेल्या माणूस घटनात्मक पदावर, त्यांना कशाचाही धाक नाही- प्रकाश आंबेडकरांची प्रखर टीका

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''आज निवडणूक आयोग एक प्रकारची बजबजपुरी माजली आहे. कणा नसलेल्या माणसाला घटनात्मक पदावर बसवण्यात आले आहे. त्यांना कशाचाही धाक नाही. त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे,'' अशा तिखट शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा माजी खासदार अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी निवडणूक आयोगावर टीका केली. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आंबेडकर साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आले होते. यावेळी ते शाससकीय विश्रामगृहात पत्रकारांना सामोरे गेले.

शासन स्टे ऑर्डरवर

ते म्हणाले, सुप्रिम कोर्टाचा निर्णय आला आणि अनेक मुद्दे अनुत्तरीत आहेत. हाच निर्णय द्यायचा होता तर एवढे दिवस का लावले. ? दुसरा भाग हा आहे, हे शासन स्टे ऑडर्रवर चालले आहे. जी स्थगिती दिली आहे त्याच्या संदर्भात जजमेंट आलेले नाही. कळीचा मुद्दा हा आहे, राज्यपाल निर्णय घेवू शकतात का? हा घटनात्मक प्रश्न आहे.

मनमानी कारभार सुरू

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आज इलेक्शन कमिशन एक प्रकारची बजबजुरी झाली आहे. कणा नसलेल्या माणसाला संविधानीक पदावर बसवले आहे. त्यांना कोणताही धाक नाही. त्यामुळे मनमानी कारभार सुरु आहे. जी काही घटना करण्यात आली आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, नवीन सभागृह हे जूनं सभागृह संपण्याच्या अगोदर गठीत झाले पाहिजे. म्हणून नवीन प्रश्न निर्माण होवू लागले आहे. मोदींचे सरकार कोणताही निर्णय घेत नाही. अचानकपणे प्रचंड मोठा निधी आल्यासारखे महाराष्ट्र सरकार घोषणा करते. मुख्यमंत्री यांना विनंती आहे नेमका किती निधी येतो, किती खर्च होतो, याचा खुलासा केला तर घोषित झालेले प्रकल्प पूर्ण होतील का नाही हे जनतेला समजेल.

म्हणूनच खोक्याचे राजकारण

प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन्ही सरकार एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यातूनच खोक्याचे राजकारण बाहेर पडले. वेदांता प्रकल्पाची नेमकी काय आणि कधी बोलणी झाले हे स्पष्ट करावे, म्हणजे खरा प्रकार समजेल. परंतु ह्यांचे तू माझी पाठ खाजवायची नाही, मी तुझी खाजवणार नाही,असे सुरु आहे.

राहुल गांधींवर टीकास्त्र

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत छेडले असता ते म्हणाले, भारत तुटला कुठे आहे?, ते सांगावं. तुटला नाही तर जोडण्याचा प्रयत्न येतोच कुठे? काँग्रेससोबत समझोता करायला तयार आहोत. परंतु ते आमची अट मान्य करत नाहीत. त्यांच्याकडून ज्या चार-चार वेळा हरलेल्या जागा मागितल्या होत्या त्या दिल्या नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीला भिती वाटते, वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केले तर हे मोठे होतील. त्यांना आम्हालाच आयसोलेशनमध्ये ठेवायचे आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला ऑफर दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...