आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. हजारो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले अहेत. मानाच्या सर्व सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. बुधवारी ५ एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस आहे. गेला महिनाभर सुरू असलेली तयारी पूर्ण झाली असून, प्रशासन यात्रेसाठी सर्वतोपरी तयार झाले आहे. चांगभलंच्या गजरात मानाच्या सर्व सासनकाठ्या आणि भाविकांनी जोतिबा डोंगरावर हजेरी लावली आहे. डोंगर गुलालाने न्हाऊन निघाला आहे.
मंदिरांना रंगरंगोटी
चैत्र यात्रेसाठी केदारलिंग देवस्थान समितीकडून संपूर्ण नियोजन केले गेले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर परिसर, पार्किंग व डोंगर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहन पार्किंग ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने सुयोग्य वाहनतळ केले असून पार्किंगमध्ये लाईटची व्यवस्था केली आहे. जोतिबा मंदिर व यमाई मंदिर शिखरांची रंगरंगोटी पूर्ण केली आहे.
भाविकांसाठी दर्शनाची सोय
भाविकांच्या सोयीसाठी नवीन दर्शन मंडपामधून दर्शन व्यवस्था केली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार असल्याने पोलिस, होमगार्ड, स्वयंसेवकांसह खासगी सिक्युरिटी गार्डची सोय केली आहे. भाविकांना मंदिर, पार्किंग या ठिकाणी जाताना गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले आहेत.
मुख्य दिवशी हे धार्मिक विधी होणार
बुधवारी पहाटे पाच वाजता 'श्रीं'ना तहसीलदार यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल. दुपारी पालकमंत्री यांच्या हस्ते पूजनाने सासनकाठी सोहळा सुरू होईल. सायंकाळी पाच वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला 'श्रीं'चा पालखी सोहळा होईल.
चोख सुरक्षा व्यवस्था
देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र मार्फत चैत्र यात्रे करिता चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- पोलिस विभागासाठी ठिकठिकाणी ट्टेहाळणी मनोरे, त्याठिकाणी स्वतंत्र ध्वनीक्षेपण यंत्रणा, कॅमरामन सोबत
- नारळ फोडणे करीता विशेष व्यवस्था नारळाचे पाणी पसरू नये यासाठी मंदिर आवारात stainless steel मध्ये स्टँड
- डोंगर पायथ्याच्या पार्किंगपासून डोंगरावर येणे जाणे करिता 40 बसद्वारे मोफत सुविधा
- सर्व शासकीय कर्मचारी, स्वयंसेवक व इतर कर्मचारी यांना जेवण पुरवठा करणेकामी 13000 कंटेनरचा पुरवठा
- यात्रा कालावधीत कोणतेही वाहन बंद पडल्यास व इतर अत्यावश्यक सेवेसाठी 2 क्रेन सर्व्हिसेस
- 30 बिनतारी संदेशवहन वॉकी टॉकी यंत्रणा सर्व प्रशासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे करीता
- दिशा दर्शक फलक सर्व यात्रा ठिकाणी व मुख्य वाहतूक मार्गावर, मुख्य रस्त्यावर पार्किंग ठिकाणे दाखवणारा नकाशा बोर्ड, इतर सुविधा दर्शवणारा बोर्ड
- दर्शन मंडप ठिकाणी रांगेतील भक्तांना थेट प्रक्षेपण शिवाजी चौक व सेंट्रल प्लाझा येथे एलइडी स्क्रीन द्वारे थेट प्रक्षेपण
- ड्रोन कॅमेरेद्वारे गर्दीवर तसेच पार्किंगवर देखील नियंत्रण, संपूर्ण परिसरावर नजर.
- तब्बल 140 कॅमेरे यांची सर्व यात्रे वर नियंत्रण व देखरेख
- परदेशातील व परराज्यातील भाविकांना फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट सोशल मीडियाद्वारे थेट लाईव्ह दर्शन प्रक्षेपण
- सेंट्रल अनाऊन्समेन्ट सिस्टीम व वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर व ध्वनि क्षेपण यंत्रणा
- 150 तात्पुरते शौचालय वेगवेगळ्या ठिकाणी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.