आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवायही अनेक विषय आहेत. चंद्रकांत पाटील मात्र पुण्याच्या, कोल्हापूरच्या की राज्याच्या राजकारणात राहायचे की परत जायचे याविषयीच्या चर्चेत राहून स्वतःला सीमित करत आहेत. मात्र, खरे म्हणजे त्यांना खऱ्या विश्रांतीची गरज आहे, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे-बंगळुरू महामार्गावर जोशी विहीर (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, संचालक नितीन पाटील, शशिकांत पिसाळ, धनंजय पिसाळ आदी उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भाव झालेल्या परिणामातून बाहेर पडून सरकार आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष जबाबदारीने विकासाला गती देण्याचे काम करीत आहेत. असे असताना सगळीकडे गेल्यावर पत्रकार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असे म्हणाले याविषयी मत विचारत असतात. मात्र देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशिवायही राज्यात अनेक विषय आहेत. त्यामुळे आम्ही राज्याच्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारचे एक वर्ष कोरोना आपत्तीतून बाहेर पडण्यात गेले आहे. त्यामुळे सरकार आता पूर्ण गतीने कामाला लागले आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चांगला समन्वय आहे. राज्यात अनेक वर्षे धरणांची व उपसा सिंचन, कालव्याची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांना चालना देण्याला आमचे प्राधान्य आहे. चंद्रकांत पाटील यांनी वर्तमानपत्रात छापणाऱ्या बातम्यांच्या भाषेला संपादकांना पत्र लिहून आक्षेप घेणार असल्याचे म्हटले आहे. ते कोणता मुद्दा घेऊन बोलतात तो मुद्दाच मला माहीत नाही आणि त्यांच्याविषयी लिहिलेलं मी काही वाचलेलं नाही आणि मी त्याच्या विषयापुरतं सीमित राहू इच्छित नाही. रोज काय तरी बोलून चर्चेत ठेवण्यापेक्षा त्यांना खऱ्या विश्रांतीची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.