आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांच्या भाषणावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया:म्हणाले- हिंदूना अभिमान वाटेल असं राज ठाकरे यांचं भाषण; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आज रुईकर कॉलनी येथे कॉफी पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कौतूक केल्याचे पाहायला मिळालं. सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणार भाषण कालचं राज ठाकरेंचं भाषण होतं. मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य आवडलं. हिंदू या शब्दात सर्व धर्म समभाव आहे. हिंदू म्हणजे बुरसटलेला असं चित्र निर्माण केलं गेल आहे. कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली, असे पाटील म्हणाले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपा उमेदवार सत्यजित कदम उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफांवर टीका -
कोल्हापुरातील जनतेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवले. यावेळी पुढच्या दिवाळीला कोल्हापुरकरांची अंघोळ थेट पाइपलाइनद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याने घालू, अशी घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. मुश्रीफ सध्या गडबडले आहेत. म्हणून वक्तव्ये करत आहेत. कोल्हापूरमधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचे दमन -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांनी हिंदुंचे मानबिंदू पुनर्स्थापित करुन, हिंदूंना प्रतिष्ठा मिळवून दिली. यापूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचे दमन केले जात होते. तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींच्या घरात धार्मिक पूजाअर्चाचे अतिशय कटाक्षाने पालन होत होते. पण इतरांना मात्र हिंदुंना धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पूजाअर्चनेला मज्जाव केला जात होता. त्यामुळे या ढोंगी लोकांपासून माननीय मोदीजींनी‌ सर्वांना मुक्त करुन, त्यांना आपली आराधना करण्याचे स्वतंत्र्य मिळवून दिले आहे, असेही ते म्हणाले.

मी काही सोन्याचा चमचा घेउन जन्माला आलो नाही -
माझ्यासारखा, सर्वसामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्याची आठ खाती सांभाळली हे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना सहन होत नाही. म्हणून दोन्ही काँग्रेसचे नेते माझ्यावर टीका करत असतात सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारखा मी काही सोन्याचा चमचा घेउन जन्माला आलो नाही,' असा टोलाही त्यांनी लगाविला.

पेटीएमच्या माध्यमातून मतदारांना पैसे पोहोचवण्याचं षडयंत्र -
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार मिळत आहे. यामुळे धास्तावलेली महाविकास आघाडी, मतदारांच्या खात्यावर पेटीएमद्वारे काळा पैसा वाटप करण्याची पूर्वतयारी करत आहे. यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...