आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्युत्तर:चंद्रकांत पाटील यांनी माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करावाच- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर20 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीय तपास यंत्रणा फेल गेल्या आहेत-मुश्रीफ

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेे भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून मारले होते.या विधानावरून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या विधानावर आज राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आजच्या आज माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करावा, असे आव्हान मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेद्वारा दिले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय'ने गुन्हा नोंद केला होता. तसेच सीबीआय'ने त्यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापे मारले होते. हे छापे भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून मारण्यात आले होते असे विधान राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. छापा प्ररकरणावरुुुुुन चंद्रकांत पाटील आणि मुश्रीफ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

आज पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ म्हणाले, परमवीर सिंग आरोप करतात, दिल्ली येथे वरिष्ठ यंत्रणांची भेट घेतात, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेच केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय सचिव यांची रातोरात भेट घेतात, त्यानंतर लगेच एन आय ए कडे तपास जातो, याचा अर्थ काय, अशी विचारणा त्यांनी केली. यापूर्वीही अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय तपास यंत्रणा फेल गेल्या आहेत

मुश्रीफ म्हणाले, परमवीर सिंग या आरोपीच्या पत्रावर सुशांत सिंग राजपूत प्रकरणी काही कारवाई नाही, अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी ठोस कारवाई नाही, या सर्व प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा फेल गेल्या आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. परमवीर सिंग आरोप करतात, दिल्ली येथे वरिष्ठ यंत्रणांची भेट घेतात, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेच केंद्रीय गृहमंत्री, कें सचिव यांची रातोरात भेट घेतात, त्यानंतर लगेच एनआयए'कडे तप जातो, याचा अर्थ काय, अशी विचारणा मुश्रीफ यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...