आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या कसबा पोटनिवडणुकीत मविआच्या रवींद्र धगेंकरांनी बाजी मारत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तत्पूर्वी या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'Who Is Dhangekar?', असा सवाल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भरसभेत केला होता. रवींद्र धंगेकरांना कमी लेखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी हा सवाल केला होता.
मात्र, निवडणुकीत 11 हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवत रवींद्र धंगेकरांनी कसबा पेठेतील आपले वजन दाखवून दिले. त्यानंतर पुण्यात चंद्रकांत पाटलांना चिमटा काढण्यासाठी मविआ कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी 'This is Dhangekar' अशा आशयाचे पोस्टर लावले. आता चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा असलेल्या कोल्हापुरातही भर चौकात This Is Dhangekar चे पोस्टर्स मविआ कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
मविआ कार्यकर्त्यांचे म्हणणे काय?
कोल्हापुरात रवींद्र धंगेकरांचे पोस्टर लावल्यानंतर मविआ कार्यकर्ते म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या प्रचारात चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांचा अपमानास्पद उल्लेख केला. रवींद्र धंगेकर हे सर्वसामान्य घरातील आहेत. त्यांचा अशा पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करणे चुकीचे आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्त म्हणून हे होर्डिंग्ज लावले आहेत.
मविआचे कार्यकर्ते म्हणाले, चंद्रकांत पाटील स्वतःला गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून घेतात आणि दुसऱ्याला मात्र खालच्या पातळीवर बोलतात. 2024 मध्येही अशाच पद्धतीचे चित्र पाहायला मिळेल.
पुण्यातही पोस्टरबाजी
पुणे शहरातही रवींद्र धंगेकर समर्थक 'This Is Dhangakr', 'Dhangekar Is Aamdar', अशा आशयाचे पोस्टर ठिकठिकाणी लावत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चांगलेच चिमटे काढत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.