आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पटलवार:मुश्रीफांची सवय "आ बैल मुझे मार"; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पटलवार

कोल्हापूर5 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात काही घडले की त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व मंत्री जयंतराव पाटील यांनाही काही म्हणायचे नसते. पंरतू लगेचच मुश्रीफांना म्हणायचे असते. ग्रामविकास विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड, असा पटलवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तुम्ही काय केले नाही तर झोंबतं कशाला?...

2014 ते 2019 बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर काय झोपा काढत होतात ? अशी विचारणा करून पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा, पण आधी 2020 बदल्यांमधील करा. तुम्ही काही केले नाही तर झोंबंतं कशाला?

डी.जीं.नी म्हटले- आस्थापना समितीच्या बाहेर सह्या करणार नाही

ग्रामपंचायतींना प्रशासक, पी. एम. केअर, सुशांत प्रकरण सगळ्या विषयांमध्ये कोर्टाकडून थपडा खायचे असतील तर कोण काय करणार ? मी जे म्हणतो ते महाराष्ट्राच्या डी.जी. नी म्हटले आहे. आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही, असेही पाटील म्हणाले.

कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार

सध्या कोल्हापूरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाही आहेत, स्वॅबच्या रिपोर्टमध्ये गोंधळ, असा हाहाकार माजला असताना त्याबाबत मंत्री मुश्रीफ काहीही बोलत नाहीत. पण वर घडणा-या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून अन्य गोष्टींवर बोलायचे हे म्हणजे गिरे तो भी.....असे म्हणल्यातला प्रकार आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser