आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:अंबाबाई मंदिर दर्शनाच्या वेळेत बदल; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सतर्क

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाने दर्शन वेळेत बदल केले आहेत. तसेच मंदिरातील भाविकांकडून होणारे धार्मिक विधी अभिषेकही बंद केले आहेत. ईपास सुविधाही बंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाचे आदेश येईपर्यंत मंदिर प्रशासनाने हे नियम निश्र्चित केले आहेत असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

१) मंदिर हे सकाळी ७.०० ते दुपारी १२ व दुपारी ३.०० ते रात्री ८.०० या कालावधीमध्ये दर्शनासाठी खुले राहील.

२) मंदिराकडे भाविकांच्या करवी करणेत येणारे धार्मिक विधी जसे अभिषेक बंद करणेत आले आहेत.

३) भावीकांसाठी करणेत आलेली ई-पासची सुविधा देखील बंद करणेत आली आहे.

४) मंदिराच्या पूर्व व पश्चिम दरवाजातून दर्शन सुरु राहणार. भाविकांनी सामाजिक अंतराचे पालन करुन दर्शनासाठी सोडले जाणार आहे.

५) मंदिरामध्ये येताना मास्क, सॅनिटायझर, तसेच भाविकांचे तापमान तपासणी सुरु असुन त्याचीकडक अंमलबजावणी करणेत येणार आहे.

६) मंदिरामध्ये विना मास्क कोणी आढळलेस रु. २००/- इतकी दंडात्मक कार्यवाही करणेत येणार आहे.

७) मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांनी छायाचित्र काढणे, व्हिडीओ करणे, सेल्फी काढणेस मनाई असुन तसे आढळून आलेस मोबाईल, कॅमेरे जप्त करुन रु. २००/- इतकी दंडात्मक कार्यवाही करणेत येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...