आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर दरवाढीमुळे निशाणा साधला जात आहे. अशातच आज कोल्हापुरात एका पेट्रोल पंपावर लागलेला बोर्ड खूप काही सांगून गेला. कोल्हापुरात एका पेट्रोल पंप चालकाने स्वतःच्याच पेट्रोल पंपावर ‘ पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंपधारक जबाबदार नाही...’ असा उल्लेख असलेला बोर्ड लावला. हा बोर्ड लागल्याने या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इंधनाच्या उच्चांकी दरवाढीमुळे सध्या देशभरात सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावरदेखील केंद्र सरकार इंधन दरवाढीवरून ट्रोल होत आहे. पंतप्रधानांचे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. पेट्रोल कंपनीकडून फोन आल्याने पेट्रोल पंप मालकाने बोर्ड हटवला.
अच्छे दिनला कोल्हापुरी टोला...
अच्छे दिन, कोल्हापुरी टोला, असे हॅशटॅग वापरत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल पंपावरील डिजिटल फलकाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी मोदी सरकारला उपहासात्मक टोला लगावला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.