आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे काम बघून विरोधकांना धडकी:मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले - भाजपशी युती अभेद्यच, मुंबई मनपा एकत्र लढू

एका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

''आमचे काम बघून विरोधकांना धडकी भरली आहे. एकराशेपैकी सातशे सरपंच युतीचे निवडून आले आहेत, आगामी काळात ही युती अभेद्य राहील. मुंबई महापालिकाही एकत्र लढू.'' अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ते सातारा येते पत्रकारांशी बोलत होते.

सफरचंदाची शेती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना स्वंयपूर्ण करणे, त्यांना जादा उत्पन्न मिळवून देणे महत्वाचे आहे हे काही शेतकरी प्रयोग करीत आहेत. फलटण तालुक्यातील माण येथे सफरचंदाची शेती केली जात आहे. या शेतकऱ्यांना इतर सहकारी शेतकरी आणि आमच्या कृषि विभागाने उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे मी जाहीर कौतूक केले आहे.

पाचशे एकरमध्ये उद्योग पार्क

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पाचशे एकरमध्ये शेती उद्योग पार्क करीत आहोत. त्याचा फायदा होईल. आम्ही विमानतळ एमआयडीसीकडे वर्ग करून नाईट लॅंडींग सुरू होईल याचा प्रयत्न आहे. विकासनिधी शहराच्या विकासासाठी कमी पडू देणार नाही. रिसर्च सेंटरचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

कराड विमानतळाचे विस्तारीकरण

मुख्यमंत्री म्हणाले, कराडमधील विमानतळ विस्तारीकरण प्रलंबित आहे. एमआयडीसी याचा विस्तार करणार आहे. कराडमध्ये येण्यापूर्वी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आठ कोटी रुपये दिले जात आहेत. मी बोलतो करतो होईल असे म्हणत नाही. जे होण्यासारखे आहे ते तत्काळ करतो. मी विकास कामे करताना पक्षभेद आणि दुजाभाव करीत नाही.

पंढरपूरच्या लोकांचे म्हणणे ऐकू

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार सर्वसामान्यांचे आहे. औद्योगिक विभागासह सर्व क्षेत्रावर आमचे लक्ष आहे. आम्ही गत तीन चार महिन्यात फास्ट निर्णय घेतले. लाखो हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. पंढरपूर काॅरिडाॅर रद्द झाला नाही तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या पुजेसाठी बोलवू अशी भूमिका घेतली त्यावर सीएम म्हणाले की, जोर जबरदस्तीने कारवाई करण्याची आमची भूमिका नाही. स्थानिक लोकांना नुकसान करून वाऱ्यावर सोडून आम्ही कारवाई करणार नाही. आपण सर्वानुमते निर्णय घेऊ.

आम्ही भूमिका स्पष्ट केली

राज्यपालाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची तुलना कुणीच मान्य करणार नाही. कुणाच्याही अशा विचारांशी मी सहमत नाही. माझी आणि फडणवीसांनी यावर भूमिका स्पष्ट केली. आम्ही उघड भूमिका घेतो. लपवत नाही.

बातम्या आणखी आहेत...