आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना भाटगिरी करणारे आवडतात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना जसे हवे तसे म्हंटले तरचं त्यांच्यासाठी चांगले, त्यांची चूक दाखवली तर त्यांना खपत नाही. मग पत्रकार पण जेलमध्ये जाणार, कंगना रानोटचे ऑफिसही पाडले जाणार. त्यांना वाटते नुसती त्यांची स्तुती करावी. पण ग्रामीण भागात याला भाटगिरी म्हणतात. पण, आम्ही भाटगिरी करणारे नाही आहोत असा टोला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

चूक दाखवली तर महाराष्ट्राची बदनामी होते मग चूका करु नका. सुशांतसिंह राजपुत प्रकरणी वेळेत एफ आय आर दाखल का झाला नाही. तुम्ही एफ आय आर दाखल केले नसल्याने सीबीआय चौकशी लागली. त्यामुळे देशभर व जगभर कारण नसताना महाराष्ट्र व पोलिसांची बदनामी तुमच्यामुळे होत आहे.

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढणे हे उत्तर असू शकत नाही

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढणे हे उत्तर असू शकत नाही. कारण कायदा उच्च न्यायालयात टिकला आता सर्वोच्च न्यायालयात खंडपीठाकडे गेला आहे. याठिकाणी मराठा आरक्षण अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे. आता तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयातील केस काढून घ्यावी लागेल. कायदा रद्दबातल करावा लागेल. ऑर्डिनन्स काढावा लागेल. परंतु याचीकाकर्ते काय स्वस्थ बसणार आहेत का? असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाला अतिशय मेहनतीने भाजप सरकारने आरक्षण दिले. उच्च न्यायालयात टिकवले. परंतु या महाभकास आघाडीला ते टिकवता आले नाही. त्याचे कारण त्यांची इच्छाशक्तीच नाही. कोणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही. कुठलेही कोऑर्डीनेट झाले नाही. सीनियर मंत्री, अॅडव्होकेट जनरल यापैकी कोणीही दिल्लीला गेले नाहीत. घरी बसून राज्य चालवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसून सुद्धा कोऑर्डिनेट केले नाही. मग कसा काय आपल्या बाजूने निर्णय लागणार? मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा हा प्रयत्न चालला आहे. तुम्हाला खरच आरक्षण द्यायचे होते, तर 1960 पासून पन्नास वर्षे तुमचे सरकार होते. काही वर्षापूर्वी तर सलग पंधरा वर्षे तुमचे सरकार होते. पण काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटतच नाही अशी टीकाही आम. पाटील यांनी केली.