आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:शेती प्रश्नांवर पुणे-बंगळुरू हायवे रोखताना शेतकरी व पोलिस यांच्यात झटापट

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आंदोलन घडला प्रकार

संसदेत पास केलेले शेतकरी कृषी विधेयके मागे घ्या या मागणीसाठी पुणे बेंगलोर हायवे वरती हातकणंगले तालुक्यातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांनी पंचगंगा पुलावर रास्तारोको केला.

शेतकरी कार्यकर्त्यांनी रास्तारोको करतांनाच पोलिस व शेतकरी यांच्यात झटापट व धक्काबुक्की झाली. गिरीश फोंडे व रवि जाधव यांना पोलिसांनी उचलून पोलीस गाडीत ढकलले. प्रचंड घोषणाबाजी व धक्काबुक्कीचा ताणतणावात पोलिस आणि प्रमुख नेत्यांना अटक केली व पोलीस स्टेशन मध्ये नेऊन सोडून दिले.

रास्तारोको करण्यापूर्वी विविध नेत्यांनी भाषणे केली. यावेळी बोलताना आंदोलनाचे संघटक भाकप जिल्हा सहसेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले," संसदेत पास केलेली कृषी विधेयके ही शेतकरीविरोधी व जनता विरोधी देखील आहेत. बाजार समित्या बरखास्त करुन अदानी अंबानीला कमी किमतीत शेतीमाल ताब्यात घ्यायचं व शेतीचं कार्पोरेटकरण, कंत्राटी शेतीच्या माध्यमातून होणार आहे. शेतीमाल हमीभावाचा कायदा करणे गरजेचे असताना सरकारने या कृषी विधेयकातील उलटी पावले टाकली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते वैभव कांबळे म्हणाले," मोदी सरकार केवळ भांडवलदारांची हस्तक आहे. नव्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून वाढतील. स्वामीनाथन आयोगाचे ंमलबजावणी करण्याचे बीजेपी ने जाहीरनाम्यात मान्य केले होते पण निवडून आल्यावर शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शे.का.प.चे प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले," बीजेपी सरकार म्हणजे शेटजी भटजीचे सरकार आहे. या देशातल्या शेतकरी बळीराजा चे शोषण हे बीजेपीचा तत्वज्ञानाचा भाग आहे.

यावेळी जनता दलाचे नेते रवी जाधव, भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, समाजवादी पार्टीचे हसन देसाई, राष्ट्रवादी पक्षाचे व्यंकाप्पा भोसले आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांची भाषणे झाली.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्‍युलर) अ.भा.किसान सभा, आम आदमी पार्टी, यासह विविध संघटना सहभागी झाल्या.