आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष प्रताब बोधे यांना कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी कोरेगावचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी दिली, अशी तक्रार सातारा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे हा गंभीर आरोप केला आहे. तसेच, आमदार महेश शिंदे यांनी आपल्यालाही जिवे मारण्याची धमकी दिली, असे निवेदनात म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोरेगावचे डीवायएसपी, पोलिस निरीक्षक यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे. यात गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
घरातून बाहेर कसे येतात ते पाहतो
निवेदनात म्हटले आहे की, 1 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी कोरेगावचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष प्रताप बोधे व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी फोन करून दिली. यावेळी सातारा जिल्हा अध्यक्ष रमेश उबाळे यालाही मी ठेवणार नाही, तुम्ही दोघेजण घरातून बाहेर कसे येतात हे मी बघतो, अशी धमकी आमदार महेश शिंदे यांनी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.
हल्ला झाल्याच आमदार शिंदेंच जबाबदार
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उबाळे यांनी म्हटले आहे की, माझ्या जीवितास आमदार महेश शिंदे यांच्याकडून धोका आहे. आज तारखेपासून माझ्यावरती कोणताही हल्ला झाला अथवा माझे काही बरेवाईट झाले तर त्यास फक्त कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे हेच जबाबदार असतील. याबाबत आपण लक्ष घालून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.
या आरोपांबाबत आमदार महेश शिंदे यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.