आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अयोध्या राम मंदिर:उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वापेक्षा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची महत्त्वाची, चंद्रकांत पाटील यांची टीका

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी जसे अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करते तसे शिवसेनेलाही करावे लागेल - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वापेक्षा स्वतःची खुर्ची महत्त्वाची आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना केली. अयोध्येला जायचे असेल तर सरकार मधील सहयोगी पक्षांचे काय म्हणणे आहे हे उद्धव ठाकरेंना जाणून घ्यावे लागेल. कारण राष्ट्रवादी व शिवसेना यांनी भविष्यात निवडणूका एकत्र लढायच्या असतील तर मुस्लिम वोट बँक शिवसेनेला मिळाली पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी जसे अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करते तसे शिवसेनेलाही करावे लागेल, असे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी जसे अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करते तसे शिवसेनेलाही करावे लागेल

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राम मंदिराची पायाभरणी व्हिडीओ कॉंन्फरन्सद्वारे करावी अशी सूचना केली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले राम जन्मभूमी मुक्त होण्यासाठी पाचशे वर्षे थांबावे लागले. हिंदूंसाठी राम जन्मभूमी अत्यंत पवित्र आहे. त्याठिकाणी मंदिर उभारणीच्या पायाभरणीस तीनशे ठराविक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी पंचाईत झाली आहे. कारण यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी राममंदिर पायाभरणीच्या कार्यक्रमास निमंत्रण येवो वा न येवो मुख्यमंत्री ठाकरे पायाभरणी समारंभासाठी अयोध्येत जाणारच असे जाहीर केले होते. आता मुख्यमंत्री ठाकरे यांना पायाभरणी समारंभाचे निमंत्रण आले आहे. परंतु अयोध्येला जायचे असेल तर सरकार मधील सहयोगी पक्षांचे काय म्हणणे आहे हे त्यांना जाणून घ्यावे लागेल. कारण राष्ट्रवादी व शिवसेना यांनी भविष्यात निवडणूका एकत्र लढायच्या असतील तर मुस्लिम वोट बँक शिवसेनेला मिळाली पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादी जसे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करते तसे शिवसेनेलाही करावे लागेल. परिणामी आता अयोध्येला जायचे की नाही एवढाच प्रश्न आहे.