आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:महालक्ष्मी मंदिराच्या छतावर 1 हजार टन वजनाचा कोबा, स्ट्रक्चरल ऑडिटमधून धक्कादायक माहिती समोर

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • लवकरच मंदिराच्या छतावरील कोबा काढण्याचे काम सुरू होणार सुरू

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या छताची गळती काढण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या कोब्यामुळे मंदिराच्या मुळ स्वरुपात बदल झाला आहे. तसेच जवळपास १ हजार टन वजनाचा कोबा छतावर असून लवकरच हा कोबा उतरवून मंदिर मुळ स्वरुपात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे मंदिर म्हणजे वास्तुस्थापत्य कलेचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना मानला जातो. मंदिर जवळपास चौदाशे वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या मुळ स्वरुपात काळानुरूप अनेक बदल होत गेले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर एक हजार टन वजनाचा कोबा म्हणजे शंभर ट्रक मातीचा थर मंदिराच्या छतावर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंदिर वास्तुला बाधा निर्माण होणे स्वाभाविक आहे. मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट मुबंई येथील स्टक्टवेल डिझायनर कन्सल्टंट यांच्याकडुन करण्यात आले आहे. स्ट्रक्चरल ऑडीट करत असताना मुख्य मंदिराच्या आतमधील व बाहेरील काही भागांवर रडार टेस्टींग केले आहे. त्यामधील रिपोर्टनुसार पहिला टप्पा म्हणजे मंदिराचे छत्ताचे वाॅटर प्रुफिंग करणे हा आहे. अहवालानुसार व मंदिराच्या छतावर घेण्यात आलेल्या चाचणी खड्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले वेगवेगळे थर याचा अभ्यास करुन त्याचे अंदाजपत्रक तयार करणेचे काम सुरु आहे. सदर अंदाजपत्रक पुरातत्व विभागाकडे मार्गदर्शन व परवानगी घेऊन कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

मणिकर्णिका कुंड लवकरच होणार खुला....

मणिकर्णिका कुंड उत्खननाच्या कामाने वेग घेतला आहे. येत्या ३ महिन्यामध्ये मणिकर्णिका कुंड खुला करण्यात येणार असुन सदर कुंड खुला झाल्यानंतर या जागेवर आवश्यक इतर विकास कामे करण्यात येणार आहेत. श्री क्षेत्र नृसिंहवाडी, जोतिबा या ठिकाणीही विकास कामांनी वेग घेतला आहे असेही त्यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser