आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:ट्रॅक्टर रॅलीतून काॅंग्रेस नेत्यांचा केंद्रा सरकारवर निशाणा, केंद्र सरकारने केलेले तीनही कायदे महाराष्ट्रात लागू करणार नसल्याचे केले स्पष्ट

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात कोल्हापूरात गुरुवारी भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. रॅलीच्या समारोप प्रसंगी काॅंग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारने रात्रीच्या अंधारात चोरुन हे कायदे केले असल्याचा आरोप करत केंद्र शासनावर निशाणा साधला. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात हे कायदे लागू करुन देणार नसल्याचे स्पष्ट केले. कोल्हापूरात पडलेली ठिणगी दिल्लीपर्यंत पोहचते हा आजपर्यंतचा इतिहास असून येथून पेटलेली ज्योत केंद्र सरकारला धक्का देण्यासाठी दिल्लीपर्यंत जाईल असा इशाराही नेत्यांनी दिला.

काँग्रेस पक्षाच्यावतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. रॅली मध्ये महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय कॉंग्रेसच्या कोमल पटेल, आमदार पी.एन.पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील,राजूबाबा आवळे यांच्यासह कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते.

केंद्र सरकारने कामगारांचे कायदे संपवून टाकले आहेत.कामगारांचा विचार केला नाही तर केवळ मालकांचा विचार केला आहे. हे सरकार कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे. तमाम शेतकरी आणि कामगार वर्ग सरकारला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा महसूल मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेबथोरात यांनी दिला.

केंद्रात असलेले भाजपा सरकार आता कांदा पाकिस्थानातून आणणार असल्याचे माझ्या कानावर आले आहे. कांदा निर्यातीला बंदी घातली आणि असे एक एक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात घेतले जात आहेत. कंपनी पद्धतीने शेती करणे आपल्या अल्पभूधारकांना शक्य नाही. त्यामुळे याला विरोध करायला हवा, असेही आवाहन येथे मंत्री थोरात यांनी केले. विरोधी आमदारांची मुस्कटदाबी करून, त्यांना निलंबित करून केंद्र सरकारने हे तीन कायदे पारित केले आहेत. त्यामुळेच त्याला विरोध करण्यासाठी देशभर ट्रॅक्टर रॅली काढली जात असल्याचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले,की खोटे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हिताविरोधात कायदे केले आहेत. आत्मनिर्भर शेतकऱ्यांसाठी कंपनी शेतीचा कायदा आणला, मार्केट कमिटीचे अस्तीत्व नाहीसे करणे एवढंच नव्हे तर न्यायालयात दाद न मागण्याचाही कायदा या खोटे पॅकेज जाहीर करणाऱ्या मोदी सरकारने आणला आहे.

अत्याचारी, शेतकरी विरोधी असलेल्या भाजप सरकारने केलेल्या कायद्याची भिषणता सांगून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात हे कायदे लागू करू देणार नसल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र शासनाने कशा पद्धतीने मुस्कटदाबी करून हे कायदे आणले त्याची माहिती दिली. पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनीही भाजपा सरकारवर टिका करीत शेतकरी आणि कामगारांच्या हिताचे कायदे होते तर ते गुपचूप का आणले असा सवाल केला. जी.एस.टी, नोटा बंदी नंतर आता शेतकरी आणि कामगारांचा गळ्या घोटण्याचे काम या भाजपा सरकारने केल्याचे सांगून त्याला विरोध करण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केल्याचे सांगितले. जोपर्यंत कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली हा लढा सुरू ठेवण्याचाही निर्धार येथे करण्यात आला.