आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानासमोर काँग्रेसची निदर्शने

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सहा महिने झालेत या पॅकेज एक दमडीही मिळालेली नाही, नेमकं या पॅकेजचं मोदी सरकारनं काय केलं? अशी विचारणा जिल्हा युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर व माजी उपाध्यक्ष धनंजय महाडीक यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाच्या माध्यमातून केली.

आंदोलनात इंद्रजित साळोखे, कल्याणी माणगावे, ऋषीकेश पाटील, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष बयाजी शेळके दिपक थोरात, उदय पोवार, विनायक पाटील, योगेश कांबळे, लखन भोगम, संजय सरदेसाई, संभाजी पाटील, आनंदा करपे, सनी सावंत, अनिल कांबळे सहभागी झाले होते.

दरम्यान, माजी खास. धनंजय महाडिक यांच्या कावळा नाका येथील कार्यालयासमोरही काॅन्ग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी महाडीक समर्थकही जमले होते. पारंपारिक विरोधक असलेल्या गृहमंत्री सतेज पाटील व महाडीक यांचे समर्थक समोर समोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

बातम्या आणखी आहेत...