आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातग्रस्त मदतीविना पडून:कंटेनर उलटला; शीतपेय लुटीसाठी उडाली झुंबड

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्याच्या दिशेने जाणारा शीतपेयाचा कंटेनर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुईखाडीच्या घाटात उलटला. ही घटना करवीर तालुक्यातील पिराचीवाडी परिसरात घडली. शनिवारी सकाळी शीतपेयाच्या बाटल्या नेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. मात्र, येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांनी मदत करायची सोडून शीतपेयाच्या पडलेल्या बाटल्या पाहिल्यानंतर त्या लुटून नेल्या. अनेकांनी दुचाकीवर येत बाटल्या लुटून नेल्या. दुसरीकडे अपघातात जखमी झालेला चालक मदतीविना बसून हाेता. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिस आल्याची माहिती मिळताच काही जण बाटल्या तेथेच सोडून पळाले.

बातम्या आणखी आहेत...