आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे धुमशान:संततधारेचा दक्षिण महाराष्ट्राला दणका : कृष्णा खोऱ्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली; वारणा नदीला पूर, वाहतूक बंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
भामरागड तालुक्तयातील पर्ल नदीच्या पुराचे पाणी शहरात घुसले - Divya Marathi
भामरागड तालुक्तयातील पर्ल नदीच्या पुराचे पाणी शहरात घुसले
  • 24 तासांत सांगलीच्या कृष्णेची पातळी गेली 13 फुटांवरून 27 फुटांवर

गेल्या दाेन दिवसांपासून सतत काेसळत असलेल्या पावासाने दक्षिण महाराष्ट्राला माेठा दणका दिला आहे. धुव्वाधार पावसाने कृष्णेसह येरळा, वारणा, पंचगंगा या नद्याही दुथडीभरून वाहू लागल्या आहेत. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांना व उद्योजकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पूरनियंत्रण कक्षातर्फे एनडीआरएफीच्या दल सज्ज ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील काही भागात वारणा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतुक बंद पडली आहे. कोयना, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी व रविवारी संततधार असल्याने कृष्णा खोऱ्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली गेली आहेत. कोयना धरणातून रविवारी दुपारी २ वाजल्यापासून ३५ हजार क्युसेसचे पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात कृष्णेची पातळी १३ फूटावरून २७ फुटावर जाऊन पोहोचली आहे.

रविवारी सकाळी कोयना धरणातून २५ हजार ४०६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून ३५ हजार क्युसेक्स करण्यात आला. अखेर दुपारी २ वाजल्यापासून तो ४० हजार क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात आला. तर वारणा धरणातून आज १० वाजता ११ हजार ६०० क्युसेक्स सांडव्यावरून तर पॉवरहाऊसमधून १३८५ अवा एकूण १२९८५ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते. दुपारी २ नंतर हा विसर्ग वाढवण्यात आला असून तो १४४०० करण्यात आला आहे.

कोयना धरणाचे दरवाजे दहा फूट वर उचलले

सातारा । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर गेल्या चार- पाच दिवसांपासून कायम असून कोयना, तारळी,उरमोडी,धोम,कण्हेर,वीर ,या धरणातून अनुक्रमे कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नदीपात्रात पाणी सोडल्याने या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या अनेक गावातून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोयना धरणाचे दरवाजे दहा फूट वर उचललेले आहेत.कोयना धरणातून कोयना नदी पात्रात ५४,६२९ क्युसेक पाणी प्रती सेंकदाला सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीच्या तसेच कराड पासुन कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा , कोयना, नीरा , तारळी , नीरा , तारळी , उरमोडी नदी काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. कोयना धरण ची पाणी पातळी ९१.३१ टीएमसी इतकी झाली असून धरण ८६.७६% भरलेले आहे.

राधानगरीचे चार दरवाजे उघडले

काेल्हापूर । धरणक्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.पाणी वाढल्यामुळे राधानगरी धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांपैकी चार दरवाजे रविवारी खुले केले आहेत. या धरणातून वीज गृहातून ७,०५६ इतका विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे. रविवारी सायंकाळी राजाराम बंधान्यावरील पंचगंगा नदीची पाणीपातळी ३४ फूट २ इंचावर जाऊन पोहचली असून जिल्ह्यातील जवळपास ६८ बंधारे पाण्याखाली आहेत. काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले असून याचे वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. असाच मुसळधार पाऊस राहिल्यास पुन्हा महापूराचा धोका निर्माण होऊ शकतो.

पर्लकाेटी नदीला पूर

गडचिरोली । गडचिराेली जिल्ह्यात पावसाच्या संतत धारेमुळे भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली असून पुराचे पाणी शहरात घुसले असून अनेक घरे पाण्याखाली गेली आहे. मध्यरात्री तीन वाजेच्या दरम्यान पुराचा पाणी शहरात शिरायला सुरुवात झाल्याने अनेक लोक घरात अडकून पडले. त्या त्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती निवारण पथकाने रेसक्यु आॅपरेशन सुरू करण्यात आले.घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून संपूर्ण शहराला सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रायगडात बाेट बुडाली; चार खलाशी वाचले, एकाचा मृत्यू

रायगड । दापोली तालुक्यातील केळशी समुद्रकिनारी मच्छिमारीसाठी गेलेली बोट बुडाल्याची दुर्घटना शनिवारी संध्याकाळी घडली होती. या दुर्घटनेत ४ जणांना वाचविण्यात यश आले होते. तर, २ जण बेपत्ता होते. या दोघांपैकी एका खलाशाचा मृतदेह आज (१६ ऑगस्ट) केळशी किनारी मिळाला आहे. तर दुसऱ्या बेपत्ता खलाशाचे शोधकार्य सुरू आहे.

केळशीतील मकबुल शेखअली चाऊस यांच्या मालकीची ‘माशाल्ला’ नावाची यांत्रिक बोट शनिवारी मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. मात्र, वादळामुळे पुन्हा खाडीत येतेवेळी अचानक मोठी लाट आली. त्यावेळी बचावासाठी वळण घेताना बोटीवर लाट आपटून बोट उलटली. बोट मालक मकबूली चाऊस , सलाम चाऊस, इम्रान अल्बा, इब्राहिम खमसे हे चारजण बोटीबाहेर फेकले गेले व त्यांच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या बोटीवरील लोकांनी त्यांना ताबडतोब मदत करून वाचवले.तर इतर दोघे शहादत इब्राहिम बोरकर व गणी इस्माईल खमसे हे बेपत्ता झाले होते..दरम्यान, शहादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह रविवार सकाळी बोटीच्याच जाळ्यात सापडला.

बातम्या आणखी आहेत...