आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगली:कोरोनाबाधित 50 मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, मनपा कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आंदोलन

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठेकेदाराच्या नियुक्तीनंतर 25 मृतदेहांवर सोपस्कार

कोरोना मृतावर अंत्यविधीची जबाबदारी पाहणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाचाच कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडल्याने बुधवारी रात्रीपर्यंत ५० कोरोनाबाधितांचे मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत राहिल्याने संतापाची लाट उसळली आहे. अखेर गुरुवारी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अंत्यविधीसाठी ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर सुमारे २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोनाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता महापालिकेच्या वतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या मिरज विभागातील एकमेव कर्मचारी कोरोनाबाधित झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होते. मंगळवारी त्यांनाही कोरोनाने ग्रासले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. त्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी कोरोना मृतदेहावर अंत्यविधीचे काम थांबवले. मिरजेत दररोज विविध रुग्णालयांतील २५ कोरोना मृतदेहांवर सध्या अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, बुधवारी सकाळपासूनच महापालिकेचे कर्मचारी स्मशानभूमीकडे न फिरकल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. दरम्यान, शहरात कोरोनाची वाढती संख्या पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठेकेदाराच्या नियुक्तीनंतर २५ मृतदेहांवर सोपस्कार
अंत्यविधी करता येत नसल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोनाबाधित मृतांवर अंत्यविधीसाठी तातडीने ठेकेदार नियुक्तीची निर्णय घेतला आणि गुरुवारी या ५० मृतदेहांपैकी २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित मृतदेहांवरही येत्या काही तासांत अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे सांगण्यात आले.