आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:राज्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाचा विस्फोट- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • 'राज्यातील पाच कोटी ग्रामीण जनतेला अर्सनिक अल्बम -३० व संशमनी वटी होमिओपॅथिक औषध वाटप करणार'

राज्यात कोरोना संक्रमण प्रचंड वाढले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनाचा विस्फोट होणार आहे, अशी भिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. टेस्टिंग अजून वाढवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील पाच कोटी ग्रामीण जनतेला अर्सनिक अल्बम -३० आणि संशमनी वटी या होमिओपॅथिक औषध वाटपाचा प्रारंभ कोल्हापुरातून झाला. शासकीय विश्रामगृह आवारात राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.

दृष्टिक्षेपात आकडेवारी

राज्यातील दीड लाख कुटुंबातील पाच कोटी सात लाख जनतेला अर्सनिक अल्बम 30 या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन कोटी एक लाख रुपये खर्चून २७ लाख, ८१ हजार, ८१६ लोकसंख्येला हे वाटप ग्रामपंचायतींच्या माध्यमातून दहा दिवसाच्या आत होणार आहे.

वित्त आयोगाच्या अखर्चित निधीच्या व्याजातून जमलेत ४० कोटी आणि लागणार आहेत १३६ कोटी रुपये.

केंद्र सरकारच्या प्रियासॉफ्टच्या माध्यमातून एप्रिलमध्ये चौदाव्या वित्त आयोगाची महाराष्ट्रातील तीन हजार कोटी रुपये अजून अखर्चित दिसत होते. आता ही रक्कम ८०० कोटीवर आलेली.

गेल्या पाच वर्षात १४ व्या वित्त आयोगाचा दरवर्षी २८२५ कोटी रुपये निधी येत होता. एकूण १४,१२५ कोटी रुपये निधी आला होता.

आता १५ व्या वित्त आयोगातून दरवर्षाला ५,८२७ कोटी रुपये व पाच वर्षात २९,१३४ कोटी रुपये म्हणजे बरोबर दुप्पट निधी मिळणार आहे. त्यामुळे वेळेवर आराखडे तयार करा, वेळेवर निधी खर्च करा.

बातम्या आणखी आहेत...