आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:फवारणी करताच कोरोना निष्क्रिय करणारा स्प्रे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांनी केला दावा

कोल्हापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक घातक विषाणू निष्क्रिय करण्याचा दावा
Advertisement
Advertisement

‘कोविड-१९’ या विषाणूला निष्क्रिय करू शकणारे महत्त्वपूर्ण संशोधन केल्याचा दावा शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोफॅब्रिक्स सेंटरच्या संशोधकांकडून करण्यात आला आहे. ‘व्हायरस कवच’ या फॅब्रिक स्प्रे (कपड्यांवर मारावयाचा फवारा) तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरससह अन्य अनेक घातक विषाणूंना निष्क्रिय करणे शक्य होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठात नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. अरुणकुमार शर्मा या संशोधकांसह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुणे येथील इको-सायन्स इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी कुलगुरू डॉ. करमळकर व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना भेटून या अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन व उत्पादनाबद्दल माहिती दिली. या तंत्रज्ञानाच्या प्रभावाने कोविड-१९ विषाणू ९९.९९ टक्क्यांपेक्षाही अधिक निष्क्रिय झाल्याचे आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये आढळल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी. एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भातील संशोधन केले आहे. यात केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिडची संयुगे असून ती विषारी नाहीत, तर पर्यावरणपूरक असल्याचा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सी ‘यूएसईपीए’ने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे, असेही या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, कोरोना विषाणूवर दररोज नवनवीन दावे करण्यात येत असले तरी अद्याप यावर लस संशोधनाचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.

संरक्षक कवचाप्रमाणे काम
हे तंत्रज्ञान वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे असून हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे. वाळल्यानंतर पुढे कपडे धुऊन टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे ते काम करते. यात केवळ सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिडची संयुगे असून ती विषारी नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.

Advertisement
0