आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:आईसह दोन मुलांचा एकाच दिवशी कोरोनाने मृत्यू, पन्हाळा तालुक्यातील कळे गावातील घटना

कोल्हापूर8 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. कोरोनाच्या फैलावाने कुटुंब चर्या कुटुंब बाधित होवू लागली आहेत. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील आईसह दोन मुलांचा आज शनिवार (दि. १९) रोजी मृत्यू झाला. कळे (ता.पन्हाळा) येथील एकाच सधन कुटुंबातील या घटनेने कळेसह, पन्हाळा तालुका, जिल्हा हादरला आसून याच कुटूंबातील वडील व अन्य एक मुलावर कोरोनाचे उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

कळेतील देसाई कुटुंबात कोरोना सदृष्य त्रासाला सुरवात झाली. सुरुवातीला आई, वडील व पोलीस दलात असलेला लहाण भाऊ यांना खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. त्यांचेवर उपचार सुरू असताना अन्य दोघांना त्रास जाणवू लागला त्यांनाही खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. एकाच देसाई कुटुंबातील आई, वडील, तीन संख्खे भाऊ असे पाच जनावर कोरोनाचे उपचार सुरू होते.

शनिवारी पहाटे देसाई कुंटूबातील सौ.मालुबाई पांडुरंग देसाई (वय ६१) यांचा मृत्यू झाला तर या पाठोपाठ त्याची मुले दिपक (वय ४२) व सागर (वय ३८) यांचा काही तासांतच मृत्यू झाला. कोरोनामुळे एकाच कुटुंबावर ही परिस्थिती ओढाल्याने कळेसह परिसर हादरला. तालुक्यात दहा दिवसाचा जनता कर्फ्यू असून देखील पाचव्या दिवशी कळे बाजारपेठ चालू केलेल्या व्यापाऱ्यांनी तातडीने सर्व व्यवहार बंद केले कळे परिसरावर कोरोनाची आता या घटनेने धास्तीच निर्माण झाली आहे.

कळे येथे अपार कष्ट करून वाळु,सळी, सिमेंट,कौले उद्योगधंद्यात जम बसवत परिसरात उद्योगपती म्हणून नाव कमावलेल्या देसाई कुटुंबातील एकाच दिवशी आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला. निधन झालेल्या दोन सख्या भावांना दोन दोन लहान मुले आहेत. यातील निधन झालेले दोन भाऊ व्यवसाय साभाळत होते तिसरा भाऊ पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असताना कोरोना पॉझिटिव्ह आला होता त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...