आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरात रोखला बालविवाह:कोरोनाची संचारबंदी आणि लॉकडाऊन ठरताहेत बालविवाहास पोषक

कोल्हापूर24 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • गतवर्षी लॉकडाऊन काळात जवळपास 30 बालविवाह रोखण्यात बालकल्याण समिती यशस्वी

पोरीला वडील नाहीत, आर्थिक परिस्थिती हालाखीची...घरात वयात आलेली पोर जीवाला घोर नको म्हणून लगीन लावत होते कोल्हापूर जिल्ह्यातील आडुर गावात बालविवाह रोखल्यावर मुलींच्या आईने हे कारण दिले. कोरोना कोणकोणत्या स्वरुपात फैलावत चालला आहे याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे...एक‍िकडे जगण्यासाठी मारामार सुरू असताना दुसरीकडे स्वतःच्या पोटच्या पोरीला अल्पवयात विवाह बंधनात अडकवून तिला जगण्यापासून परावृत्त केले जात आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाची परिस्थिती आणि नियम बालविवाहासारख्या कुप्रथेला पोषक ठरु लागले आहेत.

जिल्ह्यातील आडूर गावात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती अवनिच्या जागर प्रकल्पच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती शासन यंत्रणेस दिली. यानंतर आडूर गावामधील बाल ग्राम संरक्षण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. 18 वर्षाखालील मुलीचा विवाह करणे बेकायदेशीर असल्याची समज देऊन नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. ​​​​गतवर्षी लाॅकडाऊन काळात जिल्ह्यातील जवळपास 30 बालविवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आले. गेल्या महिनाभरापासून जवळपास सहापेक्षा जास्त बालविवाह रोखण्यात आले आहेत.

आज जिल्ह्यातील आडुर गावात 16 वर्षिय मुलीचा विवाह रोखला गेला, तिथवर यंत्रणा पोहोचली पण ज्या ठिकाणी यंत्रणा पोहोचू शकत नाही त्याचे काय ? कोरोनाचा फैलावर रोखण्यासाठी कमीत कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करण्यास मुभा आहे. पण अनेक ठिकाणी या नियमाचा लाभ उठवत सर्रास बालविवाहासारख्या कुप्रथांना बढावा दिला जात आहे.

कोरोनामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे हे वास्तव आहे. पण म्हणून कायद्याला हरताळ फासून बालविवाह करणे, मुलींचे आयुष्य धोक्यात घालणे असे होत नाही. गेल्या वर्षभरात अशी अनेक प्रकरणे आम्ही हाताळली. अनेक बालविवाह रोखण्यात समितीला यश आले. बालविवाह लावून देताना सर्वप्रथम पालकांनी विचार करावा कारण बालविवाह लावून देणार्या पालकांवर आम्ही खडक कायदेशीर कारवाई करतो. सामाजिक संस्थासोबतच सर्वसामान्यांनी सजगता बाळगून आमच्या पर्यंत अशा छुप्या प्रकारांची माहिती कळवावी असे राज्य बालहक्क संरक्षण समिती सदस्य अॅड दिलशाद मुजावर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...