आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना व्हॅक्सिन:कोल्हापूरात होणार 'कोव्हॅक्सिन' चाचणीचा दुसरा टप्पा, देशातील 13 वी साईट म्हणून ओळखली जाणार

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी नागपूरला तर दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरला मिळाली संधी

संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या 'कोव्हॅक्सिन' या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या आता कोल्हापूरात होणार आहेत. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (आयसीएमआर) भारतीय औषधे महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी त्यास मान्यता दिली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नैतिक समितीच्या (एथिक्स) कमिटीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर सोमवार पासून या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला प्रारंभ होणार आहे.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कोव्हॅक्सिन लसीचे संशोधन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील चाचण्या देशातील 12 ठिकाणी घेण्यात आल्या आहेत. कोल्हापूर ही आता कोव्हॅक्सिन चाचणीची देशातील 13 वी साईट म्हणून ओळखली जाणार आहे. याअंतर्गत 100 स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी नागपूरला संधी मिळाली होती. दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरला संधी मिळाली आहे.

'कोव्हॅक्सिन' पहिल्या टप्प्यातील चाचण्या

साईटचे नाव : स्वयंसेवक संख्या

क्रोम (गोवा) : 52

एम्स (पाटणा) : 48

एम्स (दिल्ली) : 10

चंदीगड : 40

निम्स : 45

एसआरएस (चेन्नई) : 14

जीएमआर (नागपूर) : 25

एसयूएम (भुवनेश्वर) 12

जेआरएच (कर्नाटक) : 8

राणा (गोरखपूर) : 6

कानपूर : 20

विशाखापट्टणम : 9

एकूण - 280