आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:कोरोना वॉर्ड विठूनामात मग्न; रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सत्संग

कोल्हापूर2 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा,
हा सुखसोहळा स्वर्गी नाही....

अगदी याच ओळींची प्रचिती कोल्हापूरच्या (सीपीआर) छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये येतोय. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून भजन, किर्तनातून सत्संग सुरू असतो. यामुळे रुग्णांचे मनोबल वाढले आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढच होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, दुसरीकडे एक दिलासा देणारी गोष्ट सुरू आहे, ती म्हणजे रूग्ण बरे होण्याचे प्रमानही चांगले आहे.

सत्संग , भजन, किर्तन हा आध्यात्मिक मार्ग मनोबल वाढवतो. यामुळे रुग्णांचे मनातील भिंती, चिंता मुक्त होते. याचा अनुभव सध्या कोरोना वार्ड मधील रुग्णांना येवू लागला आहे. विशेष म्हणजे याठिकाणी उपचार घेणाऱ्या अनेक वृद्ध रुग्णांना यांचा अधिक लाभ होवू लागला आहे. गांधीनगर येथील एक व्यापारी वॉर्डमध्ये दाखल झाले. याठिकाणी दाखल अनेक लोक शांत बसून होते. काहीजण मोबाईल वर बोलून पुन्हा शांत बसून रहायचे. हे पाहून त्यांनी रुग्णांचे  मनोबल वाढविण्यासाठी  भजन कीर्तनामध्ये त्यांना व्यस्त ठेवले आहे. आता रोज सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास याठिकाणी भजन किर्तन चालू राहते. 

सर्वजण आपापल्या खाटांशेजारी उभे राहून मंदिरात ज्यापद्धतीने भजन करतात अगदी त्याच पद्धतीने रुग्णालयात टाळ्या वाजवत भजन करत आहेत. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव सुद्धा त्यामुळे दूर झाला आहे.  

आम्ही एकदम टकाटक...

कोरोना कक्षातील रुग्णांशी संवाद साधला असता त्यांनी कुठला कोरोना आम्ही एकदम टकाटक आहोत असे सांगितले. उलट डॉक्टर आम्हाला म्हणाले की इथे येणारे सगळे रडत असतात तुम्ही मात्र गेले सहा दिवसांत इथले वातावरण बदलून टाकले आहे.... असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...