आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगलीतील विश्रामबाग परिसरात बनावट नोटांच्या कारखान्यातून ५० लाख रुपयांचे चलन व्यवहारात आणण्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूर पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाला आहे. जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावरच ही प्रेस गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती, असे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. याचा मुख्य सूत्रधार रमेश चव्हाण हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या बनावट नोटा सांगली-कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांत वितरित करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
सहा महिन्यांत केली छपाई :
इस्लामपूरमध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपीचे काही नातेवाईक फरार आहेत. या बनावट नोटांचा मास्टरमाइंड रमेश चव्हाण असून २ हजार ५०० व १०० च्या नोटा छापण्यात तो तरबेज होता. गेल्या सहा महिन्यांत या टोळीने ५० लाखांहूनही अधिक नोटांची छपाई करून त्या चलनात आणल्याचा संशय आहे. या बनावट नोटांची छपाई ते रात्री १० नंतर करत होते, असेही स्पष्ट झाले. आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.