आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटा जप्त:कोल्हापुरात 500 च्या एकूण 74 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त; एकाला अटक

कोल्हापूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या एका तरुणास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस पथकाने अटक केली. संबंधित तरुण चंदगड तालुक्यातील असून त्यास शहरातील शिवाजी पार्क परिसरात चिंतामणी अपार्टमेंटनजीक ताब्यात घेण्यात आले आहे. प्रमोद ऊर्फ दयानंद पुंडलिक मुळीक (३१, रा. मजरे शिरगाव, पो. नागनवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या १४८ अशा सुमारे ७४ हजार रुपयेच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस पथकाने केली. पोलिस अंमलदार ओंकार परब यांना प्रमोद मुळीक हा बनावट नोटा घेऊन शिवाजी पार्कमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...