आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना व्हायरस:कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाना कार्यस्थळावर उभारणार 1600 खाटांचे अद्यावत कोविड-19 केअर सेंटर, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूर जिल्ह्यात 16 साखर कारखान्याच्या ठिकाणी होणार कोविड-19 केंद्र

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाकडून प्रत्येकी १०० खाटांचे अद्यावत ऑक्सिजनेटेड कोविड केअर सेंटर सुरु करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व तहसीलदारांना केली आहे. जिल्ह्यातील 16 साखर कारखान्याच्या ठिकाणी अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारली जाणार आहेत.

जिल्ह्यातील कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. त्यानुसार आरोग्य मंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाकडून 100 खाटांचे अद्यावत ऑक्सिजनेटेड कोविड केअर सेंटर सुरु करण्यात यावे असे निर्देश दिलेले आहेत. ही केंद्रे पुढील कालावधीत कारखानास्थळावर येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांसाठी सुध्दा वापरता येतील त्या दृष्टीने आता पासून अशी केंद्रे तातडीने आस्थापित करावीत व केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन संबंधित कारखान्यांकडून केले जावे.

तहसीलदारांच्या कार्य क्षेत्रामध्ये असलेल्या साखर कारखाना प्रशासनाशी संपर्क करुन कारखाना कार्यस्थळावर किमान 100 खाटांचे ऑक्सिजनेटेड सुविधांसह अद्यावत कोविड केअर सेंटर तयार करण्यात यावे. कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी कारखाना प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याविषयी तहसीलदारांनी पत्र व्यवहार करावा. ज्या कारखाना स्थळावर कारखान्यांची स्वत:ची जागा उपलब्ध नसल्यास तहसीलदारांनी आपल्या स्तरावरुन आवश्यक इतकी जागा (हॉल/सभागृह) उपलब्ध करुन देण्यात यावे. कोविड केअर सेंटर तात्काळ उभे करुन तालुक्यातील कोविड -19 रुग्णांना लाभ दिला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

0