आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात गव्याचा थरार:कोल्हापूर शहरात पुन्हा गव्यांचे कळपाने आगमन

कोल्हापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारीमध्ये शहरात गव्याचा थरार शहरवासीयांनी अनुभवला होता. आता शहराच्या सीमेवर गव्यांचे पुन्हा आगमन झाले आहे. बुधवारी महावीर कॉलेजच्या मागील विन्स हॉस्पिटलच्या परिसरातील ससे यांच्या मळ्याच्या परिसरात चार गव्यांचे दर्शन झाले.. चार-पाच दिवसांपूर्वी प्रयाग चिखली, वडणगे परिसरात दिसलेला गव्याचा कळप पंचगंगा नदीचे पात्र पार करून शहराच्या सीमेवर दाखल झाल्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शहराच्या नागरी वस्तीत या गव्यांनी शिरकाव करू नये, यासाठी वन विभागाच्या बचाव पथकाने नियोजन केले आहे. मंगळवारी संबंधित परिसरात शेती असलेले जुना बुधवार पेठेतील जयवंत निकम हे म्हशींना चरायला घेऊन गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतत असताना त्यांना गव्यांचा कळप उसाच्या शेतीत चरत असताना दिसला. इतर काही मजुरांनाही गवे दिसले.

बातम्या आणखी आहेत...