आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण:बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लिपिकासह पत्नीवर गुन्हा

कोल्हापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागामधील तत्कालीन लिपिक सतीश गणपतराव सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी अर्चना सतीश सूर्यवंशीवर गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लाचलुचपत प्रतिबंध विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन कुंभार यांनी सूर्यवंशी दांपत्याविरोधात फिर्याद दिली. सूर्यवंशी यांच्या पाचगाव येथील हाऊसिंग सोसायटीमधील श्री बंगल्यासह मालमत्तांच्या ठिकाणी पथकाने झडती घेतली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात लिपिक पदावर कार्यरत असताना सतीश सूर्यवंशी यांनी अधिकाराचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. वरिष्ठांकडून चौकशीचे आदेश मिळाले होते. चौकशीत ज्ञात उत्पन्नापेक्षा म्हणजे सरासरी १९ लाख ७८ हजार ६६१ रुपयाची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आढळून आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन कुंभार यांनी (दि. ५) सकाळी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलमान्वये सूर्यवंशी दांपत्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांच्या अन्य ठिकाणांची झडती घेणे सायंकाळपर्यंत सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...