आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:मुलीला मारल्याच्या संशयावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा आत्महात्येचा प्रयत्न

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर आयटीआय येथील तात्पुरत्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन न्यायालयीन बंदीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. तानाजी दिलीप मंगे (वय 29, मूळ रा. उमरगा, उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. स्वतच्या मुलीला कानशिलात लगावल्याने मुलीचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून मंगे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

कसबा बावडा येथे 24 जुलैला सहा वर्षाची अनन्या नावाच्या मुलीचा पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. बापानेच कानशिलात लगावल्याने तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी संशयित तानाजी दिलीप मंगे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली होती.

त्याला 27 जुलै पासून आयटीआय येथील तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृह ठेवल्यापासून तो तणावात होता. त्याने मंगळवारी सायंकाळी लघुशंकेला जाऊन येण्याचा बहाणा केला आणि थेट कारागृहाच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून खाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला. त्याला तातडीने प्रशासनाने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत कळंबा कारागृह प्रशासनातर्फे संदीप जयसिंग पाटील यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.