आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर विक्षिप्त व्यक्ती विराजमान, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संविधानावर प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारणारी विक्षिप्त व्यक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाली आहे, अशा कठोर शब्दांत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

जतचे आमदार विक्रम सावंत यांनी आयोजित केलेल्या एका मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे राज्यपालांवर टीका करतेवेळी यशोमती ठाकूर यांनी प्रसिद्धिमाध्यमांनी माझे हे वक्तव्य जरूर दाखवावे, असेही नमूद केले. राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे. राज्य सरकारचे जे मूलभूत अधिकार असतात त्या निर्णयातही सध्या बाधा आणली जात आहे. ज्या संविधानाने देश एकत्र जोडला गेला आहे त्यावरच प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला प्रश्न विचारणारी व्यक्ती संविधानाचे पालन करते का, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे, असे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...